By  
on  

सिद्धार्थ आणि रितेश देशमुखच्या अभिनय जुगलबंदीने सजलेला ‘मरजावां’चा ट्रेलर

‘एक व्हिलन’च्या यशानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख ही जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही दिवसांपुर्वीच या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. त्यानंतर ट्रेलर कसा असेल याबाबत उत्सुकता वाढली होती. या सिनेमात रितेश देशमुखचा अत्यंत वेगळा लूक आहे. रितेश या सिनेमात तीन फुटी व्हिलन साकारताना दिसत आहे.

 

सिद्धार्थही या सिनेमात अ‍ॅक्शनपॅक्ड अंदाजात दिसून येत आहे. या सिनेमात सिद्धार्थसोबत तारा सुतारिया स्क्रीन शेअर करत आहे. या दोघांशिवाय रकुलप्रीतदेखील या सिनेमात दिसत आहे. या ट्रेलरमध्येही एक व्हिलनमधील ‘मै मारुंगा, तु मर जायेगा’ हा दमदार डायलॉग नवीन स्वरुपात समोर येत आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive