
बॉलिवूडच्या दोन सौंदर्यवती जेव्हा एकत्र येतात. त्यावेळी प्रेक्षकांसाठीही ती पर्वणी असते. असाच योगायोग डान्स दिवानेच्या शोमध्ये घडला. माधुरी परिक्षक असलेल्या या शोमध्ये प्रियांका ‘द स्काय इज पिंक’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी नृत्यात निपुण असलेल्या या दोघीनांही प्रेक्षकांनी नृत्यासाठी आग्रह केला.
Priyanka and Madhuri dancing on PINGA someone please pinch me @priyankachopra @madhuridixitnene
A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on
त्यावेळी ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘पिंगा गा पोरी पिंगा’ या गाण्यावर नृत्य केलं. यावेळी दोघींनीही उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. यात प्रियांका आणि फरहान अख्तर आणि झायरा वसीम यांच्या मुख्य भूमिका आहेत.