By  
on  

पाहा Trailer: वर्तमान आणि भूतकाळ यांच्यातील धमाल मनोरंजनाचा तडका 'हाऊसफुल 4'

साजिद नाडियाडवाला यांनी हाऊसफुल फ्रॅंचाईजीला पुढे नेत या 4थ्या भागाचा ट्रेलर रिलीज केला आहे. पुर्वीच्या तीन भागांप्रमाणेच हा हाऊसफुल 4 मनोरंजनाने परिपूर्ण असल्याची खात्री ट्रेलर पाहिल्यावर पटते. पण या भागाची कथा पहिल्या तीन भागांपेक्षा वेगळी आहे. पुनर्जन्मावर बेतलेल्या या सिनेमाचा प्रत्येक शॉट प्रेक्षकाला खळखळून हसवण्याची खात्री देतो. हा सिनेमा 25 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

या सिनेमात अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय क्रिती सॅनॉन, पुजा हेगडे, कृती खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. यांच्यासोबतच मनोरंजनाचा तडका लावण्यासाठी चंकी पांडे, राणा दग्गुबाती, अमांदा रोसारियो, बोमन ईरानी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे देखील या सिनेमात आहेत. ट्रेलरमध्ये 16व्या आणि 21व्या शतकाचा भव्य सेट दिसत आहे. त्यामुळे या सिनेमाचा बजेट बरच असेल यात शंका नाही. साजिद नाडियाडवाला या सिनेमाचे निर्माते आहेत तर फरहाद सामजींनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive