By  
on  

MCG टुरवर असलेला सुनील शेट्टीने शेअर केला त्याच्या क्रिकेटप्रेमाचा किस्सा

सुनील शेट्टी उत्तम अभिनेता आहेच. पण तो उत्तम क्रिकेट खेळतो हे कमी लोकांना माहिती आहे. सुनीलला त्याच्या क्रिकेटप्रेमामुळे  मेलबर्न क्रिकेट ग्राउंडकडून सन्मान प्राप्त झाला आहे. सुनीलने पत्नी मानासोबत हा सन्मान स्विकारला आहे. पिपींगमूनशी बोलताना सुनीलने या दौ-यातील आठवणी शेअर केल्या आहेत.

सुनील म्हणतो, ‘लहान मुल खेळण्याच्या दुकानात गेल्यावर जितकं आनंदित होईल तितकाच मी झालो होतो. हे स्टेडियम खुपच सुंदर आहे. या ग्राउंडशी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या आठवणी पण आहेत. या ग्राउंडवर 15 नोव्हेंबर 2020 रोजी या स्टेडियमवर T-20 वर्ल्डकप फायनल खेळली जाणार आहे. यावेळी सुनीलने भारताने ही फायनल खेळावी अशी इच्छाही व्यक्त केली आहे. सुनील व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा फॅन असल्याचं स्पष्ट केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive