By  
on  

नानाच्या चाहत्यांसाठी खुषखबर ! या सिनेमातून करणार कमबॅक

अभिनेते नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे चाहते खुप आहेत. त्यामुळे नानाच्या आगामी सिनेमाकडे ते नजर लावून बसलेले असतात. पण मीटू प्रकरणात नाव आल्यामुळे नानाला ‘हाऊसफुल 4’ सिनेमातून बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर नाना बराच काळ सिनेमापासून लांब होते. पण नाना आता परत येत आहे. सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार नाना एका तामिळ सिनेमातून कमबॅक करणार आहे.

नानांंचा हा सिनेमा एका बॉलिवूड सिनेमाचा रिमेक असल्याचंही बोललं जात आहे. याशिवाय जयम रवी हा देखील या सिनेमात झळकणार असल्याचं समजत आहे. नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने ‘मी टू’ अंतर्गत आरोप केले होते. त्यानंतर त्यांना ‘हाऊसफुल 4’ या सिनेमातून बाहेर पडावं लागलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive