By  
on  

‘हाऊसफुल 4’ च्या मेकर्सनी दिल्लीला येण्यासाठी बुक केली ट्रेन

‘हाऊसफुल 4’ च्या मेकर्सनी प्रमोशनसाठी नवीन फंडा आजमावला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मेकर्सनी आख्खी ट्रेनच बुक केली आहे. आईआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेद्वारा संचालित पहिली विशेष 'प्रमोशन ऑन व्हील्स' ट्रेन ‘हाउसफुल 4’ च्या सगळ्या टीम सोबत बुधवारी मुंबई सेंट्रल पासून रवाना होईल आणि गुरुवारी नवी दिल्लीला पोहोचेल.

 

ट्रेनला 8 डबे आहेत. सिनेमांच्या प्रमोशनसाठी भारतीय रेल्वे अशा प्रकारे बुक करता येणं आता शक्य होणार आहे. या योजनेचा शुभारंभ ‘हाऊसफुल 4’ मार्फत झाल्याचा आनंद असल्याचं अक्षयने या वेळी बोलून दाखवलं आहे. #PromotionOnWheels  या हॅशटॅगखाली अक्षयने ही पोस्ट शेअर केली आहे. हा सिनेमा 25 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive