By  
on  

पाहा Video: रितेश देशमुखचा हा अंदाज पाहून चाहतेही आश्चर्यचकित

अभिनेता रितेश देशमुख सध्या हाऊसफुल 4च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्ताने सगळी टीम वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. या दरम्यानच अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. रितेशला अक्षयने सिनेमातील ‘बाला चॅलेंज’ दिलं होतं. पण या चॅलेंजमध्येही एक ट्वीस्ट होतं. हे चॅलेंज रितेशने हटके पद्धतीने पुर्ण करायचं होतं. रितेशने ट्रॅफिक जाममध्ये हे चॅलेंज पुर्ण केलं.

 

सोशल मिडियावर हा व्हिडियोही शेअर केला आहे.  यात रितेश ट्रॅफिकमध्ये गाडीच्या बाहेर उतरुन बाला चॅलेंज करताना दिसत आहे. या सिनेमातील बाला चॅलेंज आजवर ब-याच सेलिब्रिटींनी पुर्ण केलं आहे. साजिद नाडियाडवाला हाऊसफुल 4चे सिनेमाचे निर्माते आहेत तर फरहाद सामजींनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा 25 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive