आजवर विजेत्यांवर अनेक सिनेमे बनवले गेले. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी मात्र ’पानीपत’ सिनेमाच्या माध्यमातून पराजितांचा इतिहास समोर आणला आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सनॉन, गश्मीर महाजनी, पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Come Witness The Battle That Changed History, #Panipat.
In Cinemas December 6th.@duttsanjay @kritisanon @AshGowariker #SunitaGowariker @RohitShelatkar @agppl @visionworldfilm @RelianceEnt @ZeeMusicCompany pic.twitter.com/xvo0J2O2DR— Arjun Kapoor (@arjunk26) November 1, 2019
संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या दिसणार आहे. गश्मीर या सिनेमात जनकोजी शिंदे ही व्यक्तिरेखा साकारणार हे स्पष्ट झालं आहे. अर्जुनने नुकतंच या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘ज्या युद्धाने इतिहास बदलला, त्याचे साक्षीदार व्हा’, असं कॅप्शन त्याने आपल्या पोस्टला दिलं आहे. मोहेंजोदारे नंतर आशुतोष ब-याच दिवसांनी सिनेमा घेऊन येणार आहेत. हा सिनेमा ६ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.