By  
on  

Birthday Special: बॉलिवुडचा अनभिषिक्त सम्राट 'शाहरुख खान'

शाहरुख खान....नाम तो सुना होगा... अशी प्रेमळ साद घालत त्याने आजवर अनेक फॅन्सच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत. टेलिव्हिजनपासून करीअरला सुरुवात केलेल्या या मुलाने स्वत:च्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये बस्तान बसवलं. शाहरुख सर्वप्रथम दिसला ते फौजी या मालिकेत. 

सर्कस या मालिकेने त्याला ओळख दिली. त्याच्यातील मेहनती, प्रयोगशील कलाकाराचा अनेकांना त्याचवेळी प्रत्यय आला होता. दीवानामधील भूमिकेने बॉलिवूडला नवा रोमॅंटिक चेहरा मिळाल्याची खात्री पटली. स्क्रीनवरील त्याचा एनर्जेटिक वावर त्याकाळच्या पिढीला आकर्षित करणारा ठरला. 

या दरम्यान राजू बन गया जेंटलमॅनमध्ये त्याला जुही चावलाच्या रुपाने जीवलग मैत्रिणही मिळाली. सगळं काही सुरळीत चाललं असताना शाहरुखने करीअमध्ये एक नवा प्रयोग करण्याचं ठरवलं. ‘डर’ आणि बाजीगर सिनेमांनी त्यांची प्रतिमा अ‍ॅंटी हिरो अशी निर्माण झाली. पण त्याच्या अभिनय कौशल्याची सर्वांना खात्री पटली. 

या दरम्यान आलेल्या करण अर्जुनने त्याच्यातील अ‍ॅक्शन हिरोला देखील संधी दिली. पण प्रयोगशीलतेची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यानंतर आलेल्या ‘दिलवाले दुल्हानिया ले जायेंगे’ ने मात्र इतिहास रचला. हा सिनेमा शाहरुखला रोमॅंटिक हिरोंच्या यादीत सर्वप्रथम घेऊन गेला. त्यानंतर मात्र परदेस सिनेमा रिलीज होईपर्यंत शाहरुखला यशाची वाट पाहावी लागली.  DDLJ पासून सुरु झालेला रोमॅंटिक हिरोचा प्रवास चलते चलते पर्यंत पोहोचला होता. 

मध्यंतरी आलेले देवदास, दिल से, ‘दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, मोहब्बते, कभी खुषी कभी गम, कल हो ना हो, वीर झारा हे सिनेमे त्याच्या पदरात यशाचं दान टाकून गेले. मै हू नामध्ये पहिल्यांदाच त्याने अ‍ॅक्शन आणि रोमांस या दोन्ही दगडांवर पाय ठेवला. 

स्वदेस मधला त्याने साकारलेला मोहन भार्गव आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळा होता. त्यानंतर पहेली, चक दे इंडिया, ओम शांती ओम, रब ने बना दी जोडी या सिनेमांच्या निवडीने शाहरुखने स्वत:चा असा खास प्रेक्षकवर्ग तयार केला. शाहरुखने डॉन आणि डॉन 2मुळे आपण अ‍ॅंटी हिरो भूमिका रोमॅंटिक भूमिकां इतक्याच ताकदीने निभावू शकतो हे सिद्ध केलं. 

माय नेम इज खानमध्ये अ‍ॅस्पर्जर सिंड्रोमनेग्रस्त व्यक्तीची भूमिका साकारून उत्तम प्रकारे न्याय दिला. यानंतर रा वन, जब तक है जान या सिनेमांनी यथातथाच बिझनेस केला. यानंतर आलेले हॅपी न्यु इयर, रईस, झीरो, हॅरी मेट सेजल या सिनेमांनी शाहरुखचा सक्सेस ग्राफ खाली आणला असला तरी उत्तम भूमिकांची निवड करून तो वर कसं न्यायचा हे शाहरुखला चांगलंच ठावूक आहे. त्यामुळेच तर तो बॉलिवूडचा निर्विवाद बादशहा आहे. पीपिंगमून मराठीकडून बादशहा शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा....

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive