अक्षय कुमारच्या लक्ष्मी बाँब सिनेमाची चर्चा असतानाच सलमानच्या राधेची रिलीज डेटही समोर आली आहे. अक्षयचा लक्ष्मी बाँब आणि सलमानच्या राधेची बॉक्स ऑफिस टक्कर अटळ असल्याचं दिसून येत आहे. अक्षयने लक्ष्मी बाँबच्या रिलीजची घोषणा खुप आधी केली होती. तर सलमानने राधेची घोषणा अलीकडेच केली आहे. लक्ष्मी बाँबच्या निर्माण कर्त्यांनी या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करताना लिहिलं होतं.
‘ ईद 2020ला देशात लक्ष्मी बाँब फुटेल तेव्हा होईल धमाका’. अक्षय या सिनेमासाठी खुपच उत्साहित आहे. या सिनेमात अक्षयसोबत कियारा आडवाणीदेखील आहे. तर राधे मध्ये सलमानसोबत दिशा पाटनी रोमान्स करताना दिसणार आहे. अक्षयचा ‘गुड न्युज’ हा सिनेमा 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे. तर सलमानचा ‘दबंग3’ हा सिनेमा 20 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.