By  
on  

पाहा Video: जेव्हा रितेश देशमुख अक्षय कुमारची स्टाईल कॉपी करतो

अक्षय कुमार आणि रितेश देशमुख हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या स्टायलिंगशी चांगलं परिचित आहेत. अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावलेल्या रितेशने अक्षय कुमारची चालण्याची आणि मित्रांना मिठी मारण्याची स्टाईल कॉपी करून दाखवल्यावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. 

 

रितेश ‘मरजावां’च्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये आला होता. यावेळी त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा, तारा सुतारिया, रकुल प्रीत हे देखील होते. यावेळी सगळ्यांनी मिळून खुप धमाल केली. रितेशच्या विनोदी स्वभावाने या शोची रंगत आणखी वाढवली. रितेश सध्या मरजावां सिनेमातून रसिकांच्या समोर येत आहे. यात तो बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. रितेश या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive