By  
on  

श्रद्धा कपूरने मावशी पद्मिनी कोल्हापूरेला यासाठी दिल्या शुभेच्छा

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानीपत' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात अर्जुन कपूर आणि कृती सॅनॉन मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. या सिनेमातील एकेक व्यक्तिरेखा समोर येत असतानाच श्रद्धा कपूरने या सिनेमातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राचा परिचय करून दिला आहे. श्रद्धाने तिची मावशी पद्मिनी कोल्हापूरेचा फोटो शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gopika Bai. The keys to the kingdom lie in the heart of the Queen @padminikolhapure #Panipat

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

 

पद्मिनी या सिनेमात राघोबादादांची पत्नी गोपिकाबाईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. 'या पोस्टला कॅप्शन देताना श्रद्धा म्हणते, 'गोपिका बाई. राज्याच्या चाव्या पण मनात खोट असलेली स्त्री.' पद्मिनी आणि श्रद्धाची आई तेजस्विनी कपूर या सख्या बहिणी आहेत. त्यामुळे पद्मिनी श्रद्धाची मावशी लागते. पद्मिनी ब-याच दिवसांनी सिनेमात झळकत आहे. गोपिका बाई हे इतिहासातील खल पात्र आहे. त्यामुळे पद्मिनी यांनाही नकारात्मक भूमिकेत पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता असेल.

Recommended

PeepingMoon Exclusive