By  
on  

पडद्यावरील 'सायना'च्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार हा अभिनेता

भारताची बॅटमिंटन स्टार साईना नेहवाल हिचा बायोपिक 'सायना'ची तयारी जोरात सुरु आहे. या सिनेमात परिणीत चोप्रा मुख्य भूमिकेत असणार आहे हे आम्ही तुम्हाला यापुर्वी सांगितलं आहेच. या बायोपिकमध्ये सायनाचे कोच म्हणजेच पुलैला गोपीचंद यांची भूमिका अभिनेते मानव कौल साकारणार आहेत. मानव यांनी या सिनेमातील लूक शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'My first look as @nehwalsaina's Coach.' 

 

 

या सिनेमात सायना नेहवालच्या व्यक्तिरेखेसाठी परिणीती खुप मेहनत घेताना दिसत आहे. असंही मानव यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मानव यांनी यापुर्वी अनेक सिनेमातून काम केलं आहे. तुम्हारी सुलु या सिनेमात त्यांनी विद्या बालनच्या पतीची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या सेटवरून काही दिवसांपुर्वी परिणीतीने दुखापतीचा फोटो शेअर केला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive