By  
on  

'Mens Day 'च्या निमित्ताने भाईजान सलमान खानने चाहत्यांना केलं हे आवाहन

सलमान सध्या आगामी 'दबंग 3' सिनेमाच्या बाबतीत खुपच उत्साहित आहे. या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्याची तो एकही संधी सोडताना दिसत नाही. आताही जागतिक पुरुष दिवसाचं निमित्त साधत त्याने एक व्हिडियो पोस्ट केला आहे. यामध्ये तो चाहत्यांना आवाहन करत आहे की तुमच्या नजरेतील साहसी आणि दबंग पुरुषांना नॉमिनेट करा.

 

 

यात निवडल्या गेलेल्या व्यक्तीला 'दबंग 3' कडून 'दबंग 3 बॅज ऑफ ऑनर' देण्यात येईल. एखाद्या व्यक्तीला नॉमिनेट करण्यासाठी  #Dabangg3BadgeofHonour आणि @SKFilmsOfficial सोबत टॅग करावं लागेल. या व्हिडियोमध्ये सोनाक्षी आणि अरबाज पण दिसत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभुदेवाने केलं आहे. त्यामुळे खास प्रभुदेवा टच या सिनेमाला लाभला आहे. रोमान्स, अ‍ॅक्शन, ड्रामा या प्रत्येकाचं समान मिश्रण असलेला हा सिनेमा 20 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive