मनसेने अजय देवगणच्या तानाजी सिनेमाला मराठीमध्ये डब करण्याची परवानगी दिली

By  
on  

अजय देवगण स्टारर सिनेमा  'तानाजी: द अनसंग वॉरियर' चा धमाकेदार ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नरवीर तानजी मालुसरेंच्या जीवनावर बेतलेल्या या सिनेमात अजयने दमदार परफॉर्मन्स साकारला आहे. या ट्रेलरने सोशल मिडियावर धुमाकुळ घातला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरवर लोकांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. या ट्रेलरमुळे अजयवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही ‘तानाजी’चं कौतुक केलं आहे. त्यांनी तानाजी हा सिनेमा हिंदीसोबत मराठीमध्येही डब करायला परवानगी दिली आहे. तानाजी सिनेमासाठी ही बाब विशेष आहे. कारण मनसेने मराठी सिनेमांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर हिंदी आणि इंग्रजी सिनेमांच्या मराठी ड्बिंगला मज्जाव केला आहे. अमेय खोपकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘तान्हाजी हा सिनेमा जगभरातील भाषांमध्ये डब करावा. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि निधड्या छातीच्या मावळ्यांचा पराक्रम जग पाहील.’ दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता अजय देवगणचं अभिनंदन.’

 

 

यावर अजयने अमेय यांचे आभार मानले आहेत. अजय म्हणतो,’ अमेय तानाजीचं कौतुक करण्यासाठी आभार’. आमचा सिनेमा हिंदी आणि मराठीमध्ये दाखवण्याची परवानगी दिल्याबद्द्लही आभार. मराठी शूरवीर सरदारांची गाथा त्यांच्य मातृभाषेत मांडण्यास आम्हाला आनंद वाटेल.’ 'तानाजी: द अनसंग वॉरियर' ह्या शिवरायांच्या मर्दमराठ्या शिलेदाराची शौर्यगाथा  सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

Loading...
Share