By  
on  

फ्रिडा पिंटो अ‍डकली बंधनात, बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा

स्लमडॉग मिलेनियर या सिनेमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटोने बॉयफ्रेंड कोरी ट्रॅनसोबत साखरपुडा केला आहे. तिने या साखरपुड्याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यातून दिली आहे. यासोबतचा कोरीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. फ्रिडाने शेअर केलेल्या पोस्टला उत्तम कॅप्शनही दिलं आहे.

 

 

 

“आता माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला आहे असं वाटतंय. आयुष्य, हे जग, ते डोळ्यातील अश्रू सारं काही समजू लागलं आहे. 
माझ्या हुशार प्रियकराने प्रेमाविषयी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या साऱ्या आता लक्षात येऊ लागल्या आहेत. आता मला माझी जबाबदारी समजू लागली आहे. माझ्या जीवनात तुझ्या सारखी  चांगली व्यक्ती आली आहे. त्यामुळे कायम आपण कायम एकत्र असण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या भावी नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”. ही पोस्ट शेअर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. 
कोरीला डेट करण्यापुर्वी फ्रिडा तिचा कोस्टार देव पटेलला डेट करत होती. पण दुर्दैवाने हे नातं फार काळ टिकलं नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive