प्रियांका-निकच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन, आनंदाला उधाण

By  
on  

 ग्लोबल स्टार आपली देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचे पती निक जोनास हे नेहमीच चरेचोत असतात. सोशल मिडीयावरसुध्दा ही जोडी नेहमी सक्रीय असते. या लाडक्या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस लवकरच येतोय. 

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घरातील नव्या सदस्याचा फोटो शेअर केला. प्रियांका आणि निकने गिनो नावाचा एक जर्मन शेफर्ड श्वान घेतला. प्रियांकाकडे याआधी डायना नावाची श्वान आहे. तिने आपला पती आणि या जर्मन शेफर्डचा फोटो शेअर करत माय बॉईज् असं म्हटलं आहे. तर तिचा पती निकला अंथरुणात उठवायला आलेल्या या जर्मन शेफर्डचा हा क्यूट व्हिडीओ प्रत्येकाला भावणारा आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Back with my boys.. welcome home @ginothegerman .. we still love you mostest @diariesofdiana ️ @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

पत्नी प्रियांकाने आपल्याला खुप छान सरप्राईज  दिलं असून तिचे मनापासून धन्यवाद निकने मानले आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या कपलची पहिली अॅनिव्हर्सरी येत्या १ डिसेंबरला आहे. त्यापूर्वीचं या दोघांचं एकमेकांना सरप्राईज देणं सुरु झालं आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share