By  
on  

संजय दत्त कारागृहातील आठवणींमुळे झाला भावूक

अभिनेता संजय दत्त आता ‘पानीपत’मधून रसिकांच्या समोर येत आहे. या सिनेमात तो अहमद शाह अब्दालीच्या व्यक्तिरेखेत दिसून येत आहे. पानीपतची टीम सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यावेळी त्यांनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कपिलने त्याचा गतजीवनातील अनेक आठवणी ऐकल्या. कपिलने त्याला कारागृहातील जीवनाबाबत अनेक खुलासे केले. संजयने कारागृहात लिफाफे बनवले, रेडियो प्रोग्रॅमदेखील केला, फर्निचर देखील बनवलं.

 

 

याबद्दल कपिलने विचारताच संजय म्हणतो, ‘ हे खरं आहे. मी कारगृहात ही सगळी कामं केली आहेत. एक लिफाफा बनवल्यावर मला दहा पैसे मिळायचे. ते दहा पैसे मी रोज साठवून ठेवायचो. त्या पैशातून मी बहिणीला रक्षाबंधन दिवशी भेट घेतली.’ संजयचे हे बोला ऐकून सेटवरील सगळेच काही क्षण भावूक झाले.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive