By  
on  

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे झळकणार मराठी सिनेमात

बॉलिवूडकरांचं मराठी प्रेम आता नवीन राहिलेलं नाही. कोणी निर्माता म्हणून तर कोणी दिग्दर्शक तर कोणी अभिनेता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतं. मराठी प्रेक्षक त्यांचं दणक्यात स्वागतही करतात. आता या कलाकरांच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश होत आहे. 

आपल्या धमाकेदार अभिनयाने आणि विनोदाच्या अचूक टाईमिंगमुळे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेला अभिनेता चंकी पांडे आता लवकरच मराठी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच झळकलेल्या हाऊसफुल 4 मधील त्याच्या भन्नाट अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.विनोदवीर चंकी पांडे 'विकून टाक' या मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. 'पोश्टर गर्ल' फेम दिग्दर्शक समीर पाटील या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. 

चंकीची या मराठी सिनेमातील व्यक्तिरेखा ही एका गर्बश्रीमंत अरब व्यक्तीची असल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यामुळे प्रेक्षकांना आता या चंकीच्या मराठी सिनेमा विषयी आणि भूमिकेविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive