बॉलिवुडचा हँडसम हंक हृतिक रोशन आणि करण जौहर हे चांगले मित्र आहेत. शिवाय या दोघांची जोडी पुन्हा सिनेमाच्या माध्यमातून समोर येईल यासाठीही कित्येक उत्कुस असतील. आणि नुकतच अशाच काही चर्चांना उधाण आलं होतं. हृतिक रोशन तब्बल सात वर्षांनी करण जौहरच्या सिनेमात झळकणार असं बोललं जात होतं. झालय असं की करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शन बॅनरने नितिन गोखले यांच्या R.N.Kao : Gentleman Spymaster या पुस्तकाचे अधिकार विकत घेतले आहेत. आणि लवकरच यावर आधारित सिनेमावर काम सुरु करण्यात येईल. आणि या सिनेमातील गुप्तचराच्या भूमिकेसाठी हृतिकला विचारणा झाली असल्याचं बोललं गेलं. मात्र पिपींग मूनला मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमासाठी हृतिकला विचारण्यात आलेलं नसल्याचं समोर आलय.
हा सिनेमा स्पायमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामेश्वर नाथ काओ यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. मात्र अद्याप या सिनेमात कोण झळकणार यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. करण जौहरने नुकतच या सिनेमाविषयी ट्विटदेखील केलं होतं.
Turning pages into frames, one thrill at a time.
Bringing to you an adaptation of Nitin Gokhale’s book - “R.N.Kao: Gentleman Spymaster” to the silver screen. More information coming soon!@apoorvamehta18 #AmritpalBindra @anandntiwari @DharmaMovies #StillAndStillMediaCollective pic.twitter.com/gsHoWIHknn— Karan Johar (@karanjohar) January 9, 2020
हृतिकच्या सध्याच्या प्रोजेक्ट्सविषयी बोलायचं झालं तर आगामी काळात हृतिक फराह खानच्या 'सत्ते पे सत्ता' सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसण्याची शक्यता आहे. पण याविषयीही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे हृतिक आणि अक्षय कुमार एकत्र झळकणार असल्याच्याही चर्चांना उधाण आहे.