वर्षाची सुरुवात गोड ! तानाजीने पार केला शंभर कोटींचा टप्पा

By  
on  

यावर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमागृहात दाखल झालेल्या तानाजी: दा अनसंग वॉरिअर सिनेमाने सुरुवात गोड केली आहे. या सिनेमाने आतापर्यंत कमाईमध्ये शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. तानाजीने रिलीजनंतरच्या एका आठवडयातच ही किमया साधली आहे. बुधवारी झालेल्या 16.72 कोटींच्या कमाईने सिनेमाचा 107.68 कोटींचा टप्पा गाठला. 

 

 

या सिनेमाने रिलीज झालेल्या दिवशी 15. 10 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर शनिवारी 20. 57 कोटी कमावले. रविवारी याच्यात वाढ होऊन 61.93 कोटींपर्यंत या सिनेमाने मजल मारली. तर  सोमवार को 13.75 कोटी आणि मंगळवारी 15.28 कोटी कमावले. या सिनेमातील कलाकारंच्या अदाकारीचंही कौतुक होताना दिसत आहे.

अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत शोभला आहे. अभिनेता शरद केळकर सिनेमात छत्रपती शिवरायांची व्यक्तिरेखा साकारतोय तर अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोल तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारतेय.

Recommended

Loading...
Share