ट्वींकलला अ‍ॅनिव्हर्सरीला विश करण्याचा अक्षय कुमारचा अंदाज पाहून तुम्हालाही येईल हसू

By  
on  

अक्षय कुमार आणि ट्वींकल बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. ही जोडी 17 जानेवारी 2001 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकली होती. आज हे दोघं आपली 19 वी अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहेत. अक्षयने ट्वींकलला एका मजेशीर अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

यावेळी त्याने एक खास फोटोही पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘ वैवाहिक जीवनाचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन अगदी असंच असतं. काही दिवस प्रेमाचे तर काही दिवस..... तुम्ही फोटो तर पाहातच आहात. सगळं तर सांगितलं आहे. मला या गोष्टी आणखी कोणत्या वेगळ्या रुपात मिळाल्या नसत्या. हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी टीना. पक्षीराजनकडून खुप प्रेम’. 

यावर्षी अ‍क्षयच्या हातात महत्त्वाचे सिनेमे आहेत. रोहीत शेट्टीच्या सुर्यवंशीमध्ये तो पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसत आहे. तर लक्ष्मीबाँबमध्ये तो तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. याशिवाय तो पृथ्वीराज चौहान यांच्याही व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share