By  
on  

अक्षय कुमारचा आगामी ‘बेल बॉटम’ सिनेमा होणार 2 एप्रिलला प्रदर्शित

आमीर खानने आज ट्वीटरवर जाहीर केलं की त्याच्या सांगण्यावरून अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवालाने ‘बच्चन पांडे’ या सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. बच्चन पांडे आता 22 जानेवारी 2021ला रिलीज होणार आहे. यासोबतच अक्षयने आणखी एका सिनेमाची डेट बदलली आहे. हा सिनेमा आहे बेल बॉटम. हा सिनेमा 2 एप्रिल 2021ला रसिकांच्या भेटीला येईल. 

 

 

या बदलाबाबत अक्षय म्हणतो, ‘मला माहिती आहे माझ्या सिनेमांच्या रिलीज डेटच्या बदलाबाबत अनेक मीम बनतील. पण 22 जानेवारी 2021 ही तारीख नाही तर 2 एप्रिल 2021 ही रिलीज डेट आहे.’ अक्षयचा आणि त्याचा सिनेमा क्लॅश व्हावा अशी आमीरची इच्छा नव्हती. त्यामुळेच ही तारीख बदलली गेली आहे. आता ख्रिसमसला आमीर आणि करीनाचा ‘लाल सिंह चढढा हा सिनेमा रिलीज होईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive