By  
on  

या मराठी गाण्यावर थिरकली ही बॉलिवुड अभिनेत्री

काही मराठी गाणी अशी आहेत ज्याची क्रेझ जबरदस्त आहे. काही हिंदी रिएलिटी शोच्या मंचावरही ही गाणी वाजतात किंवा त्यावर परफॉर्म केलं जातं. असचं एक गाणं म्हणजे रवी जाधव यांच्या 'नटरंग' सिनेमातील अमृता खानविलकरवर चित्रीत 'वाजले की बारा हे गाणं'. अमृताने हे गाणं आत्तापर्यंत बऱ्याच कार्यक्रमात परफॉर्म केलं आहे. आणि अजूनही या गाण्यावर विविध ठिकाणी परफॉर्म केलं जातं. नऊवारी साडीत या गाण्यावर ठेका धरायला कित्येक तरुणींना आवडतं. आणि या गाण्यावर ठेका धरायचा मोह या एका अभिनेत्रीलाही आवरता आला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanya Malhotra (@sanyamalhotra_) on

ही अभिनेत्री आहे 'दंगल' सिनेमात आमिर खानसोबत झळकलेली सान्या मल्होत्रा. सान्याने 'दंगल'नंतरही बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी तिला अजूनही 'दंगल गर्ल' अशीच ओळख आहे. सान्याने नुकतच एका शोसाठी शूट केलं यावेळी सान्या मराठमोळ्या नऊवारी लुकमध्ये होती. मग सान्याच्या टीमच्या आग्रहास्तव तिने या नऊवारी साडीत डान्स केला. 'वाजले की बारा' या मराठी गाण्यावर लिपसिंकसह सान्याने धमाकेदार डान्स केला.

@sanyamalhotra

Impromptu dance performance for my lovely team lol #dance #wajlekibara #sareenotsorry #sareelook

♬ original sound - Sanya Malhotra

 

तिच्या टिक टॉक अकाउंटवर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सही मिळाले आहेत.  

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive