धकधक गर्ल माधुरी दीक्षितचाही मदतीचा हात, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला माधुरीची मदत

By  
on  

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत मदत करण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळी पुढाकार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मदतीचा ओघही वाढताना दिसतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून माधुरीने याची माहिती दिली. माधुरी या पोस्टमध्ये लिहीते की, “मानवतेचा हा लढा जिंकण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा. मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीमध्ये दान करून माझं कर्तव्य पूर्ण करतेय. चला ताकदीने यातून बाहेर निघूयात.”माधुरी आणि पति राम नेने यांनी हा मदतीचा हात पुढे  केला आहे. शिवाय यात सगळ्यांनी पुढे येऊन योगदान करण्याचं आवाहनही माधुरी करतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mon coeur t'appartient

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

शिवाय अनुष्का शर्मा, कपिल शर्मा, अक्षय कुमार, वरुण धवन, करण जोहर, आयुषमान खुराना, गुरु रंधावा, कार्तिक आर्यन, गुरु रंधावा, टी-सीरीजचे मालक भूषण कुमार या कलाकारांनी पंतप्रधान सहाय्यक निधीला देणगी दिली. शिवाय अक्षय कुमारने 25 कोटी दान करत तो सर्वात जास्त मदतीची रक्कम देणारा अभिनेता ठरलाय.
 
 

Recommended

Loading...
Share