By  
on  

माधुरी म्हणतेय हा वेळ वाया घालवू नका, करतेय एका फोन कॉलवर कथकचा रियाज

कोरोना व्हायरसा वाढता प्रादुर्भाव असताना लॉकडाउन जाहीर केल्यानंतर घरात बसणं या महत्त्वाच्या उपायाचं पालन आपण सगळे करत आहेत. मात्र यानिमित्ताने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल यासाठी कित्येक जण विविध गोष्टी करत आहेत. 

धकधक गर्ल आणि बॉलिवुडची मोहीनी  माधुरी दीक्षितही या वेळेचा सदुपयोग करतेय. माधुरीला नृत्याची प्रचंड आवड आहे आणि हा छंद ती घरात बसून जोपासतेय. माधुरी ही कथक हा नृत्यप्रकारही शिकलेली  आहे. त्यामुळे कथकचा सराव करण्यासाठी माधुरीने  नवा उपाय सुचवला आहे. प्रसिद्ध तबला वादक कालिनाथ मिश्रा यांच्यासोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून माधुरी सराव करते. कालिनाथ यांच्या तबल्याच्या तालावर कथकचा रियाज माधुरी करतेय. त्याचा व्हिडीओही माधुरीने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

माधुरी आणि असे अनेक कलाकार सध्या सोशल मिडीयाच्या माध्यामातून घरात बसून वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. सध्याच्या परिस्थितीत अशा सकारात्मक दृष्टीकोनाची गरज सध्या भासतेय. कला विश्वातील कलाकार मंडली सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना जागकरु करत घरात बसण्याचं आवाहन करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive