कोरोनाशी लढा देणाऱ्या वॉरियर्सचे बॉलिवुडकरांनी मानले आभार, म्हटले #DilSeThankYou

By  
on  

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी मदतीचा हात पुढे करत आहेत. यातच अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 25 कोटींची मदत केली. त्यानंतर आता अक्षय कुमारने पीपीई, मास्क आणि रॅपिड टेस्टिंग किट खरेदीसाठी ३ कोटी रुपयांची मदत केली आहे.

शिवाय सोशल मिडीयावर नव्या उपक्रमासह अक्षय कुमार पुढे आलाय. अक्षयने ‘दिल से थँक यू’ असं म्हणत फोटो पोस्ट करण्याची मोहीम सुरु केली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाग्रस्तांची आणि नागरिकांची सेवा करणारे डॉक्टर्स, पोलिस, मेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी आणि इतर लोकांचे आभार अक्षयने या मोहिमेतून मानले आहेत. 

अक्षय कुमारच्या या पोस्टनंतर इतर बॉलिवुड सेलिब्रिटींनीही अक्षयच्या या मोहिमेत सहभाग घेतला आणि म्हटले ‘दिल से थॅंक यू’. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, बिपाशा बसू, करिश्मा कपूर, इशान खट्टर यांच्यासह बरेच कलाकार अक्षयच्या या मोहिमेत सहभागी होऊन या वॉरियर्सचे आभार मानत आहेत. सध्या सोशल मिडीयावर #DilSeThankYou चा ट्रेंड सुरु आहे.

 

Recommended

Loading...
Share