By  
on  

 इरफान खानने अभिनय हा गजल सारखा गायलाय – स्वानंद किरकिरे 

अभिनेता इरफान खानच्या निधनाने एक उत्तम अभिनेता गमावल्याचं दु:ख सगळ्यांनाच आहे. त्याचा सहज सुंदर अभिनय हा सगळ्यांनाच भावणारा होता. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीचं खूप मोठं नुकसान झाल्याच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swanand Kirkire (@swanandkirkire) on

गीतकार, अभिनेता, दिग्दर्शक स्वानंद किरकिरे यांनाही इरफान खानच्या निधनाने प्रचंड दु:ख झालं आहे. मात्र हे दु:ख वेगळ्या पद्धतिने मांडलय. इरफान खान हा कसा अभिनेता होता, त्याच्या अभिनयाचे कोणकोणते पैलू होते, त्याच्या अभिनयातली भावणारी गोष्ट कोणती होती? याविषयी स्वानंद किरकिरे बोलले आहेत. नुकताच त्यांनी सोशल मिडीयावर  एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “इरफान खानने अभिनय हा गजल सारखा गायलाय.” असं म्हणत त्यांनी इरफानच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. ज्या दिवशी इरफान खानचं निधन झालं त्याच दिवशी स्वानंद यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे सगळ्यांच्या शुभेच्छा येत असतानाच आलेली ही निधनाची बातमी धक्का देणारी असल्याचंही स्वानंद या व्हिडीओत म्हटले आहे. 
इरफान खानचे आत्तापर्यंतचे सगळे सिनेमे ज्यांनी पाहिले आहेत त्यांना स्वानंद यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ नक्कीच लक्षात येईल. या व्हिडीओच्या माध्यमातून स्वानंद यांनी इरफानला अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive