By  
on  

विराट सांगतो पत्नि अनुष्का निर्माती असल्याचे हे आहेत फायदे

अनुष्का शर्माच्या निर्मिती अंतर्गत अमेझॉन प्राईमची वेब सिरीज ‘पाताल लोक’ ची सगळीकडे चर्चा आहे. त्यातच निर्माती अनुष्का शर्माचा पती आणि इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीचीही या वेब सिरीज संदर्भातली खास गोष्ट समोर येत आहे. विराटला ही वेब सिरीज प्रचंड आवडली आहे. आणि अनुष्काने या वेब सिरीजची निर्मिती केल्यासाठी तिचं कौतुकही केलं आहे.

विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो नुकताच पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये विराट ‘पाताल लोक’ ही वेब सिरीज बघताना दिसतोय. या पोस्टमध्ये विराट लिहीतो की, “मी पाताल लोकचं पहिलं सिझन आधीच पाहिलं आहे. मला माहिती होतं की कथा, स्क्रिनप्ले आणि अभिनयाच्या बाबतीत ही वेब सिरीज मास्टरपीस असेल. आता मी या शोसाठी लोकांचं प्रेम पाहतोय तर मी हे सांगू इच्छितो मी ही वेब सिरीज कशी पाहिली ते. माझं प्रेम अनुष्का शर्मावर मला गर् आहे आहे आणि ते यासाठी की अशा वेह सिरीजची तिने निर्मिती केली आहे.  आणि टीम ज्यात आमचे बंधू कर्णेशही आहेत त्याच्यावरही विश्वास दाखवला. वेल डन ब्रदर.” 

 तर ट्विटमध्येही मजेत विराटने लिहीलं की “जेव्हा पत्नि निर्माती असते तेव्हा हा फायदा असतोच. मी ही वेब सिरीज एक आठवड्याआधीच पाहिली होती. वेल डन टीम क्लीन स्लेट”

 

 

‘पाताल लोक’ ही वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली असून ही वेब सिरीज प्रेक्षकांना आवडतेय.
  
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive