उद्या प्रदर्शित होणार माधुरी दीक्षितचं हे गाणं, चाहत्यांमध्ये उत्सुकता

By  
on  

अभिनेत्री सौंदर्यवती माधुरीचा डान्स, तिच्या अदा, तिचा अभिनय आणि तिच्या सगळ्यांच गोष्टींनी कित्येक वर्षांपासून तिच्या चाहत्यांना भुरळ घालतेय. मात्र आता माधुरीचा आवाज सगळ्यांच्या ह्दयाचे ठोके वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे. आय फॉर इंडियाच्या नुकत्याच झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये माधुरी दीक्षित नेने चक्क गाणं गाताना दिसली होती. यावेळी तिने परफेक्ट हे इंग्रजी गाणं अतिशय सुंदर गायलं. आणि या नंतर माधुरीला सुचली एक कल्पना. माधुरीने तिचं स्वत:चं गाणं लिहीण्याचं, गाण्याचं आणि त्यावर परफॉर्म करायचं ठरवलं. आणि हेच गाणं 23 मे रोजी प्रदर्शित होत आहे. ‘कँडल’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याची छोटीशी झलक माधुरीने काही दिवसांपूर्वी पोस्ट केली होती. आता नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करून या गाण्याविषयीची माहिती माधुरीने दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wanted to share my life with you, like you have shared it with me! #Candle releasing tomorrow.

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

 

या गाण्यात माधुरीचा इतक्या वर्षांचा प्रवास अनुभवता येणार असल्याचं माधुरी या व्हिडीओमध्ये म्हटली आहे. ती म्हणते की, “संगीत हे नेहमीच माझं आवड राहिलेलं आहे. माझं पहिलं गाणं या शनिवारी प्रदर्शित होत आहे. यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. कठीण समयी देखील आपण एकत्र उभे राहू शकतो. कँडल या गाण्याचा हाच उद्देश आहे.  हे गाणं लिहीताना, गाताना आणि परफॉर्म करताना मला जेवढी मजा आली तेवढीच मजा हे गाणं पाहताना , ऐकताना तुम्हाला येईल अशी आशा व्यक्त करते.” चाहत्यांना आता या गाण्याच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Positivity is calling & we must answer! #Candle releasing in just 2 days. Set your reminders now!

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

 

Recommended

Loading...
Share