By  
on  

रितेश देशमुखचा हा व्हिडीओ पाहाल तर व्हाल भावूक, वडिलांच्या आठवणीत केला व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नि जेनेलिया हे दोघही टिक टॉक ऐपवर सक्रिय आहेत. रितेश देखमुखचे एकापेक्षा एक एन्टरटेनिंग टिक टॉक व्हिडीओ त्याच्या अकाउंटवर पाहायला मिळतात. 
चाहत्यांना त्याचे हे व्हिडीओ प्रचंड आवडतात. सध्या लॉकडाउनमध्ये तर रितेश मोठ्या प्रमाणात त्याचे टिक टॉक व्हिडीओ शेयर करतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday PAPPA..... Miss you everyday!! #vilasraodeshmukh75

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

मात्र नुकताच पोस्ट केलेला त्याचा व्हिडीओ सगळ्यांनाच भावूक करतोय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि रितेशचे वडिल विलासराव देशमुख यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने रितेशने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रितेश त्याच्या वडिलांच्या कुर्ता-जॅकेटला मिठी मारताना दिसतोय. विलासराव जणू रितेशला मिठी मारत असल्याचा या व्हिडीओत भास होत आहे. वडिलांच्या आठवणीत रितेशने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत “मला दररोज तुमची आठवण येते पप्पा.” असं त्याने या पोस्टमध्ये लिहीलं आहे. 'अग्निपथ' सिनेमातील 'अभी मुझ में कही..' या गाण्यावर हा व्हिडीओ आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive