By  
on  

अजय देवगणचं असंही गुप्त दान, धारावीमधील हॉस्पिटलला केली मदत

करोनाग्रस्तांसाठी बॉलिवूडकर मोठ्या संख्येने मदत करताना दिसत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार अजय देवगणही या मदतीसाठी उतरला आहे. असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर किरण दिघवकर यांनी मुंबई मिररशी बोलताना ही बाब समोर आणली आहे. अजय देवगण फिल्मस फाउंडेशनच्या माध्यमातून अजयने 200 बेडसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि दोन व्हेंटिलेटर दिले. याआधी त्याने धारावीतील 700 कुटुंबासाठी रेशन दिलं होतं. 

 

 

याशिवाय विरल भयानीनेही याबाबतही पोस्ट शेअर केली आहे. ‘आपला अ‍ॅक्शन हिरो अजय देवगण 200 बेड हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि दोन व्हेंटिलेटर दिले. याशिवाय अजयने धारावीतील 700 कुटुंबासाठी रेशन पुरवलं आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive