By  
on  

'Gulabo Sitabo' Review : शूजीत सरकारचा मनोरंजक ड्रामा कॉमेडी सिनेमा ‘गुलाबो सिताबो’ मध्ये अमिताभ बच्चन आहेत टॉम आणि आयुष्मान खुराना बनला जेरी 

कलाकार - अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना, विजय राज, फ़र्रुख़ जाफ़र, बृजेंद्र काला, सृष्टि श्रीवास्तव, नल्नीश नील, टीना भाटिया

दिग्दर्शक : शूजित सरकार 

कथा, स्क्रिनप्ले आणि संवाद – जूही चतुर्वेदी

निर्माते : रॉनी लहिरी और शील कुमार

ओटीटी : अमेजॉन प्राईम वीडियो

रेटिंग: 4 मून्स 

1842 मध्ये लिहीली गेलेली जेम्स हैलिवेल फिलिप्स यांची नर्सरी क्लास मधील कविता ‘देयर वॉज ए क्रूक्ड मॅन’ आणि शूजित सरकारची अमेजॉन प्राईमवर प्रदर्शित झालेली फिल्म ‘गुलाबो सिताबो’ यात सारखेपणा जाणवतो. ही कविता होती एका चतुर व्यक्तिची आणि त्याच्या चतुराईची.
या सिनेमात ही चतुर व्यक्ती आहे मिर्जा शेख म्हणजेच बिग बी अमिताभ बच्चन. मिर्जा शेख हा लखनऊ मधील एका दूरवर पसरलेल्या हवेलीचा मालक आहे. या हवेलीचं नाव आहे फातिमा महल. मिर्जा हा प्रचंड लालची आहे. ही हवेली हस्तगत करण्यासाठी तो विविध योजना आखतो, एवढच काय तर तो त्यासाठी तो त्याच्या भाडेकरूंसोबतही पंगा घेतो.यातीलच एक भाडेकरू आहे बांके सोढी म्हणजेच आयुष्मान खुराना. जो एक अपयशी मिल मालक आहे, जो प्रेमातही अपयशी ठरलेला आहे. आणि या हवेलीत वाईट परिस्थितीत त्याची आई आणि तीन बहिणींसोबत तो राहतो. यात त्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री आणि यूट्यूब स्टार सृष्टी श्रीवास्तवने.
वृद्ध मात्र बुध्दीवान मिर्जा हा लखनऊच्या गल्लीबोळ्यात दिवसभर फिरत असतो. विशेषकरून या भूमिकेचा गेटअप लक्षवेधी ठरतो. कुर्ता पायजामायासोबत एक टोपी, चेहरा झाकलेला पंचा, मोठे लेन्स असलेला चश्मा आणि त्यातून पाहणारे त्याचे पुसट डोळे आणि विचित्र दाढी असा हा गेटअप आहे. ज्यामुळे या भूमिकेला वेगळाच रंग चढतो. ही व्यक्ती खासकरून व्याजदार दुकानदारांकडे असते जिथे तो भाडेकरूंकडून लुटलेल्या किंवा चोरलेल्या वस्तू विकतो किंवा गहाण ठेवतो. या वस्तूंमध्ये हवेलीमधील काही महागड्या गोष्टीदेखील असतात.

गुलाबो सिताबो हे विशेषकरून उत्तर प्रदेश मधील लोककलांपैकी कठपुतलीच्या खेळात याच नावाने लोकांचं मनोरंजन केलं जात.  सिनेमाची कथा धिम्या गतीने पुढे जाते तरी हा आनंद देणारा मनोरंजक सिनेमा आहे. सिनेमात क्लायमॅक्स सारखं काहीच नाही परंतु याचा शेवट तुम्ही ठरवलेल्या किंवा विचार केलेल्या शेवटापेक्षा वेगळा आहे. एका ट्विस्टसह हा सिनेमा तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणि दयेची भावन सोबत देऊन जाईल. मिर्जा आणि बांके यांच्यातील मजेदार युध्द हे टॉम एन्ड जेरीच्या कार्टूनसारखं आहे. मात्र त्याच्या सिनेमाच्या शेवटाशी काहीच संबंध नाही.  मिर्जा आणि बांके यांचं भांडण हे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पासून ते सिव्हिल कोर्ट आणि मग पोहोचतं फातिमा महल्याच्या खऱ्या मालकीणी पर्यंत. ही मालकीण साकारली आहे प्रसिध्द थिएटर कलाकार फर्रूख जाफर यांनी.  बेगमचा निकाह हा मिर्जासोबत खूप आधीच झालेला असतो. मिर्जा जो बेगमपेक्षा 17 वर्षे छोटा असतो, आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठ बेगम यासाठी तयार होते कारण तिला हा महल सोडायचा नसतो. आणि मिर्जा हा घर जावई होण्यास तयार होतो. त्यातच बेगमचा खरा प्रियकर हा तिला लंडनला घेऊन जाणार असतो. यातच मिर्जा साहेबांचं वेगळचं स्वप्न आहे. तो फातिमा महलाला बेगमच्या नावातून काढून टाकून स्वत:च्या नावावर करण्यासाठी आसुसला आहे. आणि यात राहणाऱ्या भाडेकरूंनाही बाहेर काढण्याच्या वाटेवर आहे. यातच आणखीन दोन मजेदार भूमिका या सिनेमात पाहायला मिळतात. विजय राज याने साकारलेला आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा सर्वे करणारा. तर दुसरा चतुर वकील साकारलाय अभिनेता बृजेंद्र काला यांनी.

अवीक मुखोपाध्यायने केलेली सिनेमॅटोग्राफी ही जुन्या लखनऊचा अंदाज समोर आणते. फातिमा महलचा जुनेपणा, जुने फर्नीचर, लखनऊचे जुने रस्ते यासह प्रत्येक महत्त्वाच्या आणि छोट्यात छोट्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत.शूजीत सरकारने प्रत्येक भूमिकेचा योग्य वापर केला आहे. अमिताभ बच्चन हे तर मिर्जाच्या भूमिकेत असे जगले आहेत की जर त्यांना खऱ्या आयुष्यात मिर्जा म्हणून लखनऊमध्ये ठेवलं तर त्यांना कुणी ओळखणारही नाही. त्यांनी या भूमिकेत कमाल केली आहे, शिवाय प्रोस्थेटिक मेकअप करून साकारलेली ही भूमिका इतर कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल. तर दुसरीकडे आयुष्मान खुरानाने एक गंभीर आणि जो सतत चिंतेत असणारी व्यक्ती अशी साधी भूमिका जबरदस्त साकारली आहे. फर्रूख जाफर यांनी मुघल काळातील संस्कृती आणि ही भूमिका त्यांच्या अदाकारीने सुंदर पध्दतीने साकारली आहे. विजय राज आणि बृजेंद्र काला हे त्यांच्या हटके शैलीने त्यांच्या भूमिका साकारताना दिसले. तर सृष्टी श्रीवास्तचही चांगलं काम पाहायला मिळतं.  

सिनेमात एकूण 8 गाणी आहेत जी बॅकग्राउंडला वाजतात. सिनेमात शांतनु मोइत्रा यांचं थीम संगीतही सुंदर आहे. हे संगीत लखनऊमधील जुन्या अंदाजात फातिमा महलाची कहाणी सांगतं. या कथेत हे संगीतदेखील एक व्यक्तिरेखा आहे, जी लखनऊचा दिवस ते फातिमा महलाची रात्रपर्यंतचा प्रवास करतं. आणि अशाच एका रात्री बांकेच्या हिश्याचा बल्ब चोरल्यानंतर फातिमा महल अंधारात जातं आणि इथूनच जूही चर्तुवेदी यांची खिळवून ठेवणाऱ्या कहाणीमध्ये विविध रंग भरले जातात.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive