By  
on  

सुशांत सिंह राजपूतच्या घरी पोहचली अभिनेत्री अंकीता लोखंडे, पाहा Video

बॉलिवूडचा  एक हरहुन्नरी कलाकार म्हणून सुशांत सिंह राजपूत ओळखला जायचा  एम एस धोनी सिनेमात धोनी साकारुन त्यानं सर्वांचीच मनं जिंकली . पवित्र रिश्ता या मालिकेतील मानवच्या भूमिकेमुळे तो घराघरांत पोहचला. बॉलिवूडमध्येही त्याने आपलं स्थान निर्माण केलं.  मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहते आणि कलाविश्व शोकसागरात बुडालं

सुशांतला खरी ओळख मिळवून देणा-या पवित्र रिश्ता या मालिकेतील त्याची नायिका आणि एक्स गर्लफ्रेंड अंकीता लोखंडे नुकतीच त्याच्या कुटुंबियांची भेट घ्यायला त्याच्या वांद्रे येथील क्वा्टर रोड परिसरातील घरी आली आहे. तिच्या या भेटीचा व्हिडीओ माध्यमांच्या कॅमे-यात कैद झाला. 

सुशांत आणि अंकिताची केमिस्ट्री पवित्र रिश्ता या मालिकेमुळे ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीनही रंगली. ते दोघंही जवळपास सात वर्ष रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर दोघंही वेगळे झाले ते पुन्हा कधीच एकत्र न होण्यासाटी. अलिकडेच लॉकडाऊनमध्ये अंकीताने एका उद्योगपतीसोबत साखरपुडा केल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. 

 

 

एका मित्राच्या सोबतीने अंकीता नुकतीच सुशांतच्या वांद्र्याचया घरी त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला पोहचल्याचं पाहायला मिळालं. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive