By  
on  

 बॉलिवुडमधील नेपोटिझमवर बोलली सुष्मिता सेन, बोलली “इंडस्ट्रीत नेपोटिझम नेहमीच होतं...”

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवुडमधील नेपोटिझमवर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. शिवाय काही स्टार किड्सनाही लक्ष्य केलं जात आहे. नुकतच बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेनने तब्बल 10 वर्षांनी अभिनयात पुनरागमन केलय. ‘आर्या’ या वेबसिरीजमधून ती भेटीला आली आहे. या वेब सिरीजसाठी सुष्मिताचं प्रचंड कौतुक होत आहे. नुकतच एका प्रसिध्द वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता सेनने तिचा कमबॅक आणि बॉलिवुडमधील नेपोटिझम या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
 
 ती म्हणते की, “आउटसाइडर आणि इनसाइडर यांच्याविषयी चर्चा होणं ही काही नवीन गोष्ट नाही. यांच्यात होणारी स्पर्धा ही देखील नवीन गोष्ट नाही. मला असं वाटतं की सगळ्यांसाठी ही स्पर्धा समान असायला हवी हे महत्त्वाचं आहे. सध्या सगळीकडे याच विषयावर चर्चा होत आहे. मात्र आपण सगळं हे सहन केलय हे काही नवीन नाही. हे काही असं का जे आपण पहिल्यांदाच अनुभवतोय ? ही प्रतिस्पर्धात्मकता किंवा आता सगळे ज्याला नेपोटिझम म्हणत आहेत, हे एक असं सत्य आहे जे नेहमीच राहणार. जोपर्यंत या इंडस्ट्रीचं अस्तित्त्व आहे तोपर्यंत हे राहणारच. मात्र नेहमी जेव्हा कोणतं संकट येतं तेव्हा अशाप्रकारे एकमेकांकडे बोट दाखवणं चुकीचं आहे.”


पुढे सष्मिता म्हणते की, “दुसऱ्यांच्या यशाची ईर्ष्या करणं चुकीचं आहे. हे खरं आहे की आपण नेहमीच याविषयी कौतुक करु शकत नाही. नेपोटिझम हे काही नवीन नाही जे आता हैशटॅग होत आहे. जर याला बदलण्याची गरज आहे तर आपण सगळ्यांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. एका व्यक्तिची ही जबाबदारी नाही. या इंडस्ट्रीत तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कधीच कुणाला इतका हक्क देऊ नका की त्या व्यक्तिमुळे तुम्हाला वाटेल की त्या व्यक्तिशिवाय तुम्ही या इंडस्ट्रीत टिकूच शकत नाही.”
नेपोटिझम या विषयावर सध्या बरीच चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहे. त्यात विविध सेलिब्रिटी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. सुष्मितानेही या मुलाखतीत तिच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 19 जून रोजी सुष्मिता सेनची वेब सिरीज ‘आर्या’ ही हॉटस्टार स्पेशलवर प्रदर्शित झाली आहे. राम माधवानी यांनी दिग्दर्शित केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive