By  
on  

सुशांत सिंग राजपुतच्या लग्नाबाबत वडिलांनी केला हा खुलासा, रिया चक्रवर्ती बाबत केलं हे विधान

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करून स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतची ही एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून जाणारी आहे. सुशांतच्या निधनाने बॉलिवुडसह त्याचे चाहतेही हळहळले.  सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं की सुशांत 2021मध्ये लग्नाच्या विचारात होता. यासोबतच ते म्हणाले की ते केवळ अंकिताला ओळखतात, रिया चक्रवर्तीबाबत त्यांना माहिती नाही. 

 

केके सिंग यांची सुशांतसोबत लग्नाबाबत बोलणी झाली होती. तो म्हणाला होता, ‘ मी आता कोरोनामध्ये लग्न करणार नाही. त्यानंतर माझा एक सिनेमा रिलीज होणार आहे. त्यानंतर मार्च-फेब्रुवारीमध्ये पाहता येईल.’ लग्नाबाबत हेच बोलणं शेवटचं झाल्याचं केके यानी सांगितलं.  यासोबतच त्यांनी सुशांतला त्याला आवडलेल्या मुलीशी लग्न करण्याचा सल्लाही दिला होता. सुशांतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ 24 जुलैला डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive