By  
on  

राधिका आपटेने केलं दिग्दर्शनात पदार्पण, या शॉर्टफिल्मचं केलं दिग्दर्शन

राधिका आपटे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं नाव. वेबसिरीज, सिनेमा, शॉर्ट फिल्म आणि सिनेमांमधून राधिका आपटेने स्वतःच्या अभिनयाची छाप पडली आहे. ‘लय भारी’ सिनेमातून राधिका रसिकांसमोर आली. ‘पॅडमॅन’ ,’ अंधाधून’, ‘पार्स्च्ड’, ‘मांझी-द माऊंटन मॅन’, ‘हंटर’ या सिनेमांमधून तिने आपली छाप पाडली आहे. 

 

 

लस्ट स्टोरी’, ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘घूल’ या वेबसिरीजमध्ये राधिकाने स्वत:चा असा खास ठसा उमटवला. पण राधिका आता वेगळी वाट चोखाळताना दिसत आहे. राधिकाने अलीकडेच दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. 
एका शॉर्टफिल्मचं दिग्सदर्शन तिने केलं आहे. स्लीपवॉकर असं तिच्या शॉर्टफिल्मचं नाव आहे. 'पाल्म्स स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिव्हल'मध्ये तिच्या या शॉर्ट फिल्मला पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे राधिकाच्या दिग्दर्शनाने पदार्पणातच सगळ्यांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. या शॉर्टफिल्मला 'बेस्ट मिडनाइट शॉर्ट पुरस्कार' मिळाला आहे. राधिकाने अलीकडेच ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive