By  
on  

सुशांतच्या 14 वर्षीय फॅनने केली आत्महत्या, सुशांतच्या मृत्यूमुळे झाला होता निराश

बॉलिवूडचा  एक हरहुन्नरी कलाकार म्हणून सुशांत सिंह राजपूत ओळखला जायचा. एम एस धोनी सिनेमात धोनी साकारुन त्यानं सर्वांचीच मनं जिंकली. पण सुशांतच्या जाण्यानंतर तो कोणत्या नैराश्येने ग्रासला होता यावर विचार मंथन सुरु आहे. पण यावर उहापोह सुरु असतानाच आणखी एक सुन्न करणारी बातमी समोर आली आहे.

 

 एका प्रथितयश वृत्तपत्रानुसार सुशांतच्या आणखी एका फॅनने आत्महत्या केली आहे. सुशांतच्या नागपुर येथील 14 वर्षांच्या फॅनने आत्महत्या केली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर हा मुलगा खुप अस्वस्थ होता. सुशांतच्या मृत्यूच्या बातम्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्या घरातल्यांनी बातम्यांपासून लांब ठेवलं होतं. या मुलाने कोणतीही सुसाईड नोट मागे ठेवली नाही. यापुर्वीही सुशांतच्या दोन फॅन्सनी आत्महत्या केली होती. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive