‘फेअर अॅण्ड लव्हली’मधून फेअर शब्द काढण्याबाबत अभिनेत्री नंदिता दास म्हणते, ‘ सगळ्यात मोठं पाऊल’
फेअर अँड लव्हलीची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हरने फेअर अँड लव्हलीच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयनुसार आता प्रॉडक्टच्या नावतून फेअर हा शब्द काढून टाकला जाणार आहे. या निर्णयाचं अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं आहे. अभिनेत्री नंदिता दासनेही या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
एका लिडिंग वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणते, हिंदुस्थान युनिलिव्हरने फेअर अँड लव्हलीच्या अॅडमधून ‘फेयरनेस’, 'व्हाइटनिंग आणि 'लाइटनिंग’ हे शब्द काढायचं ठरवलं आहे. ही बाब खुप आनंददायी आहे. अखेर त्यांनी उत्पादन बंद न करता संदेश बदलला आहे. लीड प्रॉड्क्टने असा निर्णय घेणं कौतुकास्पद आहे.
जगात अनेक मुद्द्यावरून धर्म, जाती, जेंडर, सेक्सुलटी, भाषा या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून भेदभाव केला जातो. पण प्रत्येकजण स्वतंत्र विचारांसोबत जगत असतो. आता हा मुद्दा अधोरेखित केला जातो आहे याचं कौतुक आहे. परदेशातील जॉर्ज फ्लॉयड च्या मृत्यूनंतर कृष्णवर्णाच्या बाजूने अनेक लोक मैदानात उतरले. अभिनेता अभय देओलनेही याबाबत फेअरनेस क्रिम विकणा-या कंपनीवर निशाना साधला होता.