टिक टॉक स्टार सिया कक्कडच्या आत्महत्येची बातमी ताजी असताना आता आणखी एका टिक टॉक स्टारच्या मृत्यूची खबर समोर येत आहे. सियाने वयाच्या 16 व्या वर्षी आयुष्य संपवलं होतं. आताही सोनीपत येथील टिक टॉक स्टार शिवानी खोबियान हिची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
शिवानीचं शव बेडखाली मिळालं आहे. टिक टॉकवर तिचे 1 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. या प्रकरणी आरिफ नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात आहे. कारण शिवानीला आरिफच सर्वात शेवटी भेटला होता. त्यानंतर शिवानी गायब होती. तिच्या सलूनमधील बेडमधून वास येऊ लागल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे.