By  
on  

अजय देवगणने रिलीज केले 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चे दोन पोस्टर्स, समोर आला संजय दत्तचाही फर्स्ट लुक  

'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' ही लवकरच प्रदर्शित होणारी वॉर ड्रामा फिल्म आहे. या सिनेमात अजय देवगण, संजय दत्त, राणा दग्गुबती, सोनाक्षी सिन्हा, परिणीति चोप्रा, नोरा फेतीह, शरद केळकर, अम्मी विर्क आणि प्रणिता सुभाष हे कलाकार झळकणार आहेत. हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच झालेल्या डिझ्नी प्लस हॉटस्टारच्या लाईव्ह कार्यक्रमात या सिनेमाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. 

यात एका पोस्टमध्ये अजय देवगण तर दुसऱ्या पोस्टमध्ये संजय दत्त आहे.  यासह 'सडक-2', 'लक्ष्मी बॉम्ब', 'सडक-2', 'बिग बुल', 'लूटकेस', 'खुदा हाफीज'  या सिनेमांचे पोस्टर या लाईव्ह कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. शिवाय या सिनेमांविषयी लाईव्हमध्ये उपस्थित कलाकारांनी चर्चा केली. . 

 

Recommended

PeepingMoon Exclusive