पुन्हा एकदा या वाहिनीवर दिसणार ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका

By  
on  

अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आठवणी चाहत्यांना अधिकच हळवं करत आहेत. या गुणी अभिनेत्याने 14 जुनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. सुशांत आपल्यात नसला तरी त्याच्या सिनेमा मालिकांमधून तो आपल्यात आहे. सुशांतने ‘पवित्र रिश्ता’ या मलिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. या मालिकेत त्याने मानव हे व्यक्तिरेखा साकारली होती. सरळ, साधी असलेली ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

 

 

या मालिकेदरम्यानच त्याची अंकिता लोखंडेसोबत ओळख झाली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतलं होतं. या जोडीची ऑनस्क्रीन लव्हस्टोरी पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. झी अनमोल वाहिनीवर ही मालिका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान प्रसारित केली जाणार आहे.

Recommended

Loading...
Share