अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाने घेतला मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय

By  
on  

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची ऑनस्क्रिन जोडी पसंत केल्यानंतर ऑफस्क्रिन जोडीही लोकांना पसंत आहे. सोशल मिडीयावर दोघही विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतात. यात काही विनोदी व्हिडीओ तर काही महत्त्वाचे संदेश देणारे व्हिडीओही असतात. नुकताच दोघांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आहे त्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या निर्णयाविषयी. हा निर्णय आहे अवयवदानाचा. रितेश आणि जेनेलिया या दोघांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.

रितेश याविषयी व्हिडीओमध्ये म्हणतो की, “मी आणि जेनेलियाने याविषयी खूप विचार केला, कित्येकदा चर्चाही केली, पण कधीच सांगू शकलो नाही. मात्र आज आम्ही 1 जुलैला हे सांगू इच्छितो की आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.”
तर जेनेलिया याविषयी सांगते की, “आमच्यासाठी या भेटवस्तूपेक्षा कोणती भेटवस्तू नाही. मी तुम्हालाही विनंती करते की जर तुम्हालाही काही दान करायचं असेल तर तुम्हीही अवयवदानाचा विचार करा.”
रितेश आणि जेनेलियाच्या या निर्णयाचं आता सोशल मिडीयावरही कौतुक होत आहे.

Recommended

Loading...
Share