By  
on  

सुशांत सिंग राजपुतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज?

अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूला आता तीन आठवडे होत आहेत. सुशांतच्या जाण्यानंतर आठवणींच्या माध्यमातून तो आपल्यात आहे. याशिवाय चाहत्यांना त्याच्या शेवटच्या सिनेमाची उत्सुकता आहे.  हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. शिवाय सिनेमाच्या मेकर्सनी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 24 जुलै पासून डिझ्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा पाहता येणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sushant was not just the hero of my debut film as a director but he was a dear friend who stood by me through thick and thin. We had been close right from Kai Po Che to Dil Bechara. He had promised me that he would be in my first film. So many plans were made together, so many dreams were dreamt together but never once did I ever imagine that I would be releasing this film without him. There can be no better way to celebrate him and his talent. He always showered immense love on me while I was making it and his love will guide us as we release it. And I'm glad that the Producers have made it available for everyone to watch. We are going to love and celebrate you my friend. I can visualise you with your beautiful smile blessing us from up above. Love you

A post shared by Mukesh Chhabra CSA (@castingchhabra) on

 

पण यासोबतच मेकस उद्या म्हणजेच 6 जुलैला सिनेमाचा ट्रेलर जारी करण्याची मनीषा बाळगून आहेत. 25 जूनला या सिनेमाचं पोस्टर समोर आलं होतं. या सिनेमात सुशांतसोबत अभिनेत्री संजना सांघी झळकणार आहे.  'दिल बेचारा' हा सिनेमा हॉलिवुडच्या 'फॉल्ट इन अवर स्टार्स' या सिनेमाचा रिमेक आहे. मुकेश छाबरा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमाला डिन्से-हॉटस्टारचे नॉन सबस्क्रायर्सही पाहू शकणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive