By  
on  

धक्कादायक: ऐश्वर्याचा Covid-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह, आराध्यालाही सौम्य लागण

अमिताभ आणि अभिषेकनंतर आणखी धक्कादायक रिपोर्ट समोर येताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चनचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला दिसत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या दोघींनाही आयसोलेशन वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आहे. यासोबतच जया बच्चन यांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे. ऐश्वर्याला सध्या तरी कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीयेत.

 

जया यांच्यासोबतच श्वेता नंदा, अगस्त्य नंदा आणि नव्यानवेली नंदा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या दोघींवर 3 डॉक्टरांची टीम उपचार करताना दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive