By  
on  

राधिका आपटे गेली हॉटेलमध्ये चाहते विचारतायेत, मास्क कुठे आहे?

अभिनेत्री राधिका आपटे सध्या लंडनमधील घरी आहे. आंतरराष्ट्रीय विमानं बंद होण्यापुर्वीच राधिका लंडनला गेली आहे. येथील वेळ राधिका कुकिंग, वाचन यामध्ये घालवत आहे. यासोबतच ती सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.पण तिच्या अलीकडच्या सोशल मिडिया पोस्टमुळे मात्र तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिने हॉटेल मधील फोटो नुकताच शेअर केला होता. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिला मास्क का लावला नाही असं विचारत ट्रोल केलं आहे.

 

 

या हॉटेलमधील शेफसोबत तिने फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राधिका आणि शेफ या दोघांनीही मास्क लावलेला नाही तसंच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालनही करताना दिसत नाही. त्यामुळे नेटिझन्सनी तिची चांगलीच उलटतपासणी केली आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive