By  
on  

भाईजान सलमान चक्क शेतात गाळतोय घाम, शेअर केला हा फोटो

या लॉकडाऊनमध्ये सलमानने त्याचा बराचसा वेळ पनवेलच्या फार्महाऊसवर घालवला आहे. पण तिथेही सलमान स्वत:ला कशातरी बिझी ठेवतोच आहे. पावसाला सुरुवात झाल्याने भात लावणीच्या कामांना जोर आला आहे. सलमानही यात मागे नाही. सलमाननेही पनवेलच्या फार्महाऊसवर भातलावणी केली. यावेळी त्याने एक फोटोही शेअर केला आहे. अंगावर चिखल उडालेला फोटो सलमानने शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Respect to all the farmers . .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

सलमान आगामी राधे: युवर मोस्ट वाँटेड भाई सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण राधे...'च्या शूटिंगला अद्याप अवकाश असल्याने तो सध्या शेतीत रमला आहे.  'दाने दाने पे लिखा है, खानेवाले का नाम.....जय जवान, जय किसान'  हे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive