By  
on  

Watch Trailer : 'शकुंतला देवी'चा बेस्ट फ्रेंड गणितासोबत मैत्री करायला तयार व्हा, कारण यात रुल्स नाही तर जादू आहे  

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री विद्या बालन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. विद्याच्या ज्या सिनेमाची सगळेच वाट पाहत होते त्या ‘शकुंतला देवी’ सिनेमाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे.
‘शकुंतला देवी’ हा सिनेमा यावर्षीच्या मोस्ट अव्हेटेड सिनेमांपैकी एक आहे. अनु मेनन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  अमेझॉन प्राईमवर हा सिनेमा येत्या 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरमध्ये विद्या तिच्या विद्यार्थ्यांना तिचा बेस्ट फ्रेंड मैथ्स म्हणजेच गणितासोबत भेट करून देते.    

 
ह्यूमन कॉम्प्यूटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवीची भूमिका विद्या बाललने या सिनेमात साकारली आहे. अभिनेत्री सान्या मल्होत्रा यात शकुंतला देवीच्या मुलीची भूमिका साकारतेय. 2 मिनीटे 47 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये गणिताविषयी लहापणापासून असलेली आवड आणि हुशार शकुंतला तिच्या कॉम्प्यूटर सारख्या चालणाऱ्या मेंदूने सगळ्यांना कशी चकीत करते हे पाहायला मिळतय. शिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतारही यात पाहायला मिळत आहेत. 
हा ट्रेलर पाहूनच सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढल्याचं कित्येक जण सोशल मिडीयावर बोलत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive