By  
on  

माधुरी दीक्षित चाहत्यांशी शेअर करणार तिची Dance Diaries

अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. ती चाहत्यांशी अनेक बाबी शेअर करत असते. आताही माधुरी तिचा नृत्याचा प्रवास चाहत्यांसमोर आणणार आहे. माधुरी चाहत्यांसोबत तिची ‘डान्स डायरी’ शेअर करणार आहे. माधुरीचा सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या डान्स प्रवासातील बाबी चाहत्यांशी शेअर करणार आहे.

 

 

 
यावेळी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तिने तिचे सर्वात पहिले डान्स गुरुंबाबतही सांगितलं आहे. याशिवाय डान्स हे तिच्या आईचं पॅशन असल्याचंही नमूद केलं आहे. आईकडून हा वारसा माधुरीला मिळला आहे. तिच्या आईला नृत्याची आवड असल्याने तिला आपोआपच गोडी लागली. माधुरीच्या युट्युब चॅनेलवर तिचा हा प्रवास पाहता येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive