By  
on  

विद्या बालनने 5000 मुलांसहित व्हर्च्युअली लाँच केलं ‘शकुंतला देवीचं’ पहिलं गाणं

विद्या बालन स्टारर बायोपिक शकुंतला देवी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी तयार आहे. एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये या सिनेमाचं पहिलं गाणं ‘पास नही तो फेल नही’ लाँच केलं गेलं. या गाण्यात शकुंतला देवी मुलांच्या मनात असलेली गणिताची भिती घालवत आहेत. 100 हून अधिक शहरातील 5000 विद्यार्थ्यांनी या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये हिस्सा घेतला. या गाण्याला सचिन-जिगर यांचं संगीत आहे. 

 

 

सुनिधी चौहान यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. वायू यांनी हे गाणं लिहिलं आहे. या सिनेमात विद्या बालनसोबत सान्या मल्होत्रा दिसत आहे. यासोबत जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्यदेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 31 जुलैला अमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive